गडचिरोलीविदर्भ

राकाँ (अजितदादा पवार) गट अहेरी तालुकाध्यक्षपदी नागेश मडावी यांची नियुक्ती

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटाच्या अहेरी तालुका अध्यक्ष पदी नागेश मडावी यांची मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी नियुक्ती केली आहे. अहेरी तालुक्याची अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने अहेरी विधानसभेत सर्व स्तरावरून नागेश मडावी यांचे अभिनंदन केले जात आहे.

नागेश मडावी हे मनमिळावु स्वभावाचे असून ते अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक कामात नेहमी तत्पर आहेत. रवींद्र बाबा आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष, माजी जि.प. सदस्य रामेश्वर बाबा आत्राम, बबलू भय्या हकीम, माजी सरपंच कैलास कोरेत, बाबुराव तोरेम, कैलास पटवर्धन, ताजू कुडमेथे, नागेश पेंदाम, पुष्पा लोने, रतन दुर्गे, डेव्हिड बोगी, इरफान पठाण, विशेष भटपल्लीवार, लक्ष्मण एरावार, बालाजी गावडे तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button