गडचिरोलीविदर्भ

भंडारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आ. कृष्णा गजबे यांची प्रचाराला सुरुवात

मान्यवरांच्या उपस्थितीत जनतेशी संवाद

आरमोरी : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कृष्णा दामाजी गजबे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी वैरागड येथील पौराणिक भंडारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रचार व जनसंवाद दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आ.गजबे यांनी या परिसरात 10 वर्ष केलेली कामे आणि आपली पुढील भूमिका आणि संकल्पना मतदारांसमोर ठेवत त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमात मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत गजबे यांनी जनतेशी संवाद साधून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

रविवारी सकाळी 10 वाजतापासून गावभेटींना सुरूवात होणार आहे. यात येरकडी, मरारटोला, अंतरगाव, खेडेगाव, पलसगड, चारभट्टी, धानोरी, साधुटोला, तळेगाव, चिखली, वडेगाव असा आ. कृष्णा गजबे यांचा दौरा राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button