
गडचिरोली पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
गडचिरोली : शहरातील गोकुलनगर येथे एका चारचाकी वाहनातून दारूसह 4 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या 3 सप्टेंबर रोजी केली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथ टीमने गोकुलनगर येथील हनुमान मंदिराच्या आवारात पाळत ठेवली असता, एक पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कंपनीचे चारचाकी वाहन कं. एम एच 34 ए.एम. 6730 संशयीतरित्या येवुन उभी झाली. वाहनाची पाहणी केली असता, चारचाकी वाहनाच्या मागील सिटवर व डिक्कीत 1 लाख 20 हजार रुपये किमतीची खाकी रंगाच्या 15 नग सिलबंद खरड्याचे बॉक्स मध्ये रॉकेट संत्रा देशी दारू मिळून आली. एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी स्विप्ट कपनीची वाहन क. एम एच 34 ए.एम. 6730 असे नबर प्लेट असलेली 3 लाख 70 हजारांची चारचाकी असा एकूण 4 लाख 90 हजारांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून प्रमोद दिलीप भोयर (33), मुकेश प्रकाश बोधलकर (37) दोन्ही रा. गोकुलनगर वार्ड नं. 23, गडचिरोली या दोन्ही आरोपींना पकडून मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता, संबंधित मुद्देमाल संदिप प्रदिप बंडी (38) रा. गोकुलनगर, याचा असल्याचा कबुली दिली. याप्रकरणी संबंधित तिन्ही आरोपींवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संदिप प्रदिप बंडी हा आरोपी फरार आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोना स्वप्नील कुडावले, पोशी स्वदीप मेश्राम, पोशी तुषार खोब्रागडे, पोशी राजू कळंबे, पोशी थामदेव बोभाटे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका टीम उपस्थित होती. पुढील तपास मपोना विरंगना ऊईके करीत आहेत.



