गडचिरोलीविदर्भ

51 रुग्णांनी घेतला तालुका क्लिनिकचा लाभ

गडचिरोली : दारूचे व्यसन लागले आहे अशा एकूण 51 रुग्णांनी मुक्तिपथ अंतर्गत असलेल्या विविध तालुका उपचार क्लिनिक येथे भेट देऊन उपचार घेतला आहे. दारूचे व्यसन हे प्रयत्न, औषध उपचार व सांगीतलेले पथ्य पाळले तर दारू सुटू शकते. अशा दारू सोडण्याची इच्छा असणार्‍या व आजारी असलेल्या रुग्णांना उपचार मिळावे यासाठी मुक्तीपथ तर्फे 12 ही तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी व्यसन उपचार क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील आठवड्यात एकूण 51 रुग्णांनी आपल्या तालुक्यातील क्लिनिकचा लाभ घेतला आहे.

दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना शारीरिक व मानसिक दुष्परिणाम दिसून येताच, दारूमुळे थेट मेंदूवर परिणाम होत असल्याने विचारशक्ती कमी होते. दारूचे व्यसन जडलेल्या सदस्यांमुळे संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दारू पिणे हा आजार आयुष्यभराचा, शरीराचा, मनाचा व गुलामगिरीचा आजार आहे. मात्र उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आतापर्यंत अनेकांनी दारूचे व्यसन सोडले आहे व आपल्या नवीन जीवनाला सुरवात केली आहे. करिता मुक्तिपथ तर्फे आव्हान करण्यात येते की, दारूचे व्यसन ज्यांना आहे त्यांनी या क्लिनिक मध्ये येऊन उपचार घ्यावा. मागील आठवड्यात मुलचेरा 6, कुरखेडा 5, एटापल्ली 17, आरमोरी 6, अहेरी 17 अशा एकूण 51 रुग्णांनी उपचार घेत दारूमुळे निर्माण झालेल्या समस्यामधून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन करीत औषधोपचार देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button