गडचिरोलीविदर्भ

ट्रॅक्टरवरून पडून २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

दर्पणगुडा-घोट मार्गावरील घटना ; खराब रस्त्यांमूळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

घोट : ट्रॅक्टरवरून तोल जाऊन खाली पडल्याने नीलेश दीपक सुरजागडे (वय २६, रा. घोट) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

नीलेश सुरजागडे हा एमएच ३३ एफ ४११३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर बसून दर्पणगुडा गावावरून घोटकडे येत होता. ट्रॅक्टर रितीक वैरागड चालवत होता. ट्रॅक्टर भरधाव वेगात असताना नीलेशचा अचानक तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला. दुर्दैवाने, ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी, मृत नीलेशचे वडील दीपक सुरजागडे यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिडाम करत आहेत.

दरम्यान, घोट परिसरातील रस्ते अत्यंत खराब झाले असून, खड्डे चुकवताना अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनेची माहिती मिळताच, नीलेशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. नीलेशचा मृतदेह पाहून त्यांनी मोठा आक्रोश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button