
गडचिरोली : राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आणि परिवर्तन घडवण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध भागात परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या कार्तिक स्वामी महाराजांच्या मंदिरातून परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.
या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह गावा गावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात साथ देण्याचे आवाहन जनतेला केले. प्रसंगी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



