
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित सुरजागड आयरन माईन्स येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमूवर्स प्रा.लि. चे कर्मचारी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात के. सथीराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. कार्यकारी संचालक आर.आर. सतपथी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी युनिट हेड सुभासिस बोस (उपाध्यक्ष – माईनिंग), एल. साईकुमार (एव्हीपी-कॉर्पोरेट अफेअर्स), अरुण रावत (एव्हीपी एचआर आणि प्रशासन), संजय चांगलानी, इतर वरिष्ठ अधिकारी व गावातील, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाचा समारोप आनंदाने पारितोषिक वितरण समारंभाने झाला. विविध इन-हाऊस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच विभागीय स्तरावर ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे समर्पण, शिस्त आणि उपस्थितीबद्दल सन्मानित करण्यात आले.



