
गडचिरोली : येथे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत करीत स्वतःच्या प्रयत्नातून गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथील क्रिडांगणा करिता भरीव निधी आणलेल्या व सुरू असलेल्या विकास कामांबद्दल चर्चा केली.



