भंडाराविदर्भ

गोविंदांच्या स्पर्धेतून जीवनातील अडचणींवर मात करण्याची शिकवण मिळते – आ. नरेंद्र भोंडेकर

भंडारा येथे दहीहंडी स्पर्धा उत्साहात; आदिशक्ती शीतलामाता ग्रुप विजेता

भंडारा : दहीहंडी स्पर्धा म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून विजयाचा आनंद साजरा करणे, अशी शिकवण देणारा उत्सव आहे. गोविंदांच्या या स्पर्धेतून जीवनातील अडचणींवर मात करण्याची शिकवण मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

संताजी युवा मंडळ आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने जलाराम चौकातील मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे गोंदिया-भंडारा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उप जिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकुरे, धनराज साठवणे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष साविता तुरकर, संताजी युवा मंडळाचे अध्यक्ष सतीश तुरकर, उपाध्यक्ष माणिक अहीरकर, सचिव नितीन गायधने आदी उपस्थित होते.

आमदार भोंडेकर म्हणाले की, पूर्व विदर्भात दहीहंडी स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे, अशा वेळी गेल्या २४ वर्षांपासून संताजी युवा मंडळाने अथक परिश्रम करून ही परंपरा जपली आहे. पुढील वर्षी या उत्सवाचे २५ वे म्हणजेच रजत महोत्सवी वर्ष असेल आणि तो अधिक उत्साहात साजरा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नारळ फोडून त्यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत आदिशक्ती शितलामाता ग्रुपने हंडी फोडून ३१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले.

कार्यक्रमादरम्यान, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाचे नेतृत्व करत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कु. प्राची केशव चपट हिचा सत्कार आमदार भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सहसचिव रोशन काटेखाये, महेश शहरे, बंटी क्षीरसागर, जीवन कावळे, राहुल वाघमारे आणि इतर सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button