गडचिरोलीविदर्भ

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनीचा’: नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा गौरव

४५ महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार ; कार्याला केला सलाम

चंद्रपूर/गडचिरोली : महावितरण कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ‘सन्मान सौदामिनीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गडचिरोली मंडल कार्यालयात ३० सप्टेंबर रोजी महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

गडचिरोली मंडल कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता हरीश गजबे होते. ‘औसंवि/ब/३१०४६ दि. २५/०९/२०२५’ या परिपत्रकानुसार हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महावितरणच्या एकूण ४५ महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर (गडचिरोली मंडल), अधीक्षक अभियंता सानप (पायाभूत आराखडा, चंद्रपूर परिमंडळ) यांच्यासह गडचिरोली येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्रीच्या पवित्र पर्वावर महावितरणमधील ‘सौदामिनी’ (वीज) म्हणून कार्यरत असलेल्या महिलांच्या महत्त्वाच्या योगदानाला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आदराचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button