गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

फडणवीस, मुनगंटीवारांच्या डीलीटला विरोध ; २१ संघटनांनी घेतला समांतर दीक्षांत कार्यक्रम

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डीलीट पदवी, तसेच अन्य एका व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ आदिवासी आणि बहुजन समाजाशी संलग्न २१ संघटनांनी इंदिरा गांधी चौकात समांतर दीक्षांत कार्यक्रम आयोजित केला.

02 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होता. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डीलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. मात्र हा कार्यक्रम सुरु असताना २१ संघटनांनी माजी आमदार हिरामण वरखडे आणि कवी वसंत कुलसंगे यांचा सत्कार करुन सन्मानपत्र प्रदान केले. सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. विद्यापीठ विशिष्ट विचारसरणी व राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आझाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम, मुव्हमेंट  फॉर जस्टिसचे राज बन्सोड, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, शेकाप जिल्हा चिटणीस रामदास जराते, कवयित्री कुसुम अलाम, कुणाल कोवे, माजी नगरसेवक गुलाब मडावी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button