गडचिरोलीविदर्भ

दारू व तंबाखूवर नियंत्रणासाठी सर्व विभागाकडून होणार कृती 

कोरची मुक्तिपथ तालुका समितीची बैठक संपन्न 

गडचिरोली : कोरची येथील तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका समितीची बैठक संपन्न झाली. यात शहरासह ग्रामीण भागातून अवैध दारू व तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभागाच्या वतीने समन्वय साधून कृती करण्याचे ठरविण्यात आले. सोबतच व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

ही बैठक तहसीलदार  प्रशांत गद्दाम यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, ग्रामीण रुग्णालय समुपदेशन भैसारे, मुक्तिपथ कोरची येथील तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे, प्रेरक युवनाथ मेश्राम, अरुणा गोंनाडे व स्पार्क कार्यकर्ता धर्मेंद्र कुसराम उपस्थित होते.

दरम्यान, सभेत शासकीय विभागाच्या व शाळेच्या 100 यार्ड परिसरातील पानठेले कायम बंद करणे व शासकीय कर्मचारी सुद्धा तंबाखू खाणार नाही, किराणा दुकानात तंबाखूजण्य पदार्थ बंदी करणे, पोलीस विभागाकडून गावातील व शहरातील दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करून दारू विक्री बंद करणे, ग्रामपंचायत पातळीवर तंबाखू मुक्तीसाठी समिती स्थापन करणे, गाव संघटना व शक्तीपथ, मुक्तिपथ संघटनेला ग्रामपंचायत मध्ये मान्यता द्यावे, नगरपंचायतद्वारे शहरातील अवैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ बंद करण्यात यावे. शाळा, विद्यालय, महाविद्यालय तंबाखूमुक्त करण्यासाठी निकषांचे पालन करणे. पंचायत समिती निवडणुका दारूमुक्त करण्यासाठी पोलीस स्टेशन कडून कडक कारवाई करण्यात यावी, आपल्या मुलांना कॅन्सर पासून वाचावा यासाठी जनजागृती करणे, रुग्णालयमध्ये येणारे व्यसणी व्यक्तीला तालुका क्लिनिकला रेफर करण्यात यावे, दारू व तंबाखू बंदीसाठी युवकांची संघटना तयार करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

यावेळी तहसीलदार यांनी अवैध दारू व तंबाखू या व्यसनाच्या विळख्यात भावी पिढी सापडू नये, म्हणून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button