जिल्हा परिषदेत कृषी दिन कार्यक्रम साजरा

भंडारा : दरवर्षी प्रमाणे 17 जुन 2024 ते 1 जुलै 2024 या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचना नुसार जिल्हयात तालुका निहाय मोहीम शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देवून, नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, सेंद्रीय शेती तसेच विविध कृषि विभागाच्या योजनाची माहिती देण्यात आली. या मोहीमेचे समारोह कार्यक्रम कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त जिल्हा परिषद, सभागृह भंडारा येथे कृषि दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती राजेश सेलोकर, महीला व बालकल्याण समिती सभापती स्वाती वाघाये, कृषी समिती सदस्या पुजा हजारे, जि.प. सदस्या सौ. पटले, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगीता माने, कृषि विकास अधिकारी प्रमोद वानखेडे, जिल्हा कृषी अधिकारी विकास एम. चौधरी, कृषी उपसंचालक पी.पी. गिधमारे, वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश मस्के, कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेषराव निखाडे उपस्थित होते.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी कै. वसंतराव नाईक यांचे फोटोचे पुजन केले त्यानंतर सन 2020, 2021, 2022 या वर्षात शासन स्तरावरुन पुरस्कार जाहीर केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकास गोपीचंद मस्के, अनिल शिवलाल किरणापुरे, स्वप्नील शंकरराव नंदनवार, अजय वसंता भुते, मोरेश्वर खुशाल सिंगनजुडे, रेशिम मोहनलाल रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगीता माने यांनी कृषि विभागाच्या संपूर्ण योजना तसेच सेंद्रीय शेती व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादनामध्ये वाढ करण्याचे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. परवते यांनी भात पिकावरील व्यवस्थापन याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश गोपीचंद मस्के यांनी आपल्या मनोगतातुन भात शेती सोबत भाजीपाला पिक लागवड व नविन तंत्रज्ञानाचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. राजेश सेलोकर यांनी त्यांच्या भाषणातुन शेतकऱ्यांना आजच्या कृषि दिनाचे महत्व सांगून सेंद्रीय शेती भविष्यात करुन आपल्या कुटुंबाला विषरहीत अन्यधान्य उपलब्ध करुन कुटुंबाला सुदृढ बनवावे असे मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित शेतकरी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषि विभाग, जिल्हा परिषद, भंडारा येथिल सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी सहकार्य केले.



