
गोरेगाव : तिर्थक्षेत्र पोंगेझरा पुरगाव (हि.) येथे तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत ८० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. एकूण मंजूर ८० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकाम ३० लक्ष रुपये, भक्त प्रतिक्षालय बांधकाम २० लक्ष रुपये, सौंदर्यीकरण १० लक्ष रुपये, पेवींग ब्लॉक लावणे १० लक्ष रुपये आणि रेलिंग बांधकाम १० लक्ष रुपये अशा कामांचा समावेश आहे. दरम्यान पंकज रहांगडाले यांनी महादेव मंदिरात विधीवत पूजा अर्चना करुन समाजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी पंस सदस्य चित्रकला चौधरी, माजी पंस सदस्य पुष्पराज जनबंधू, मा. पुरगावचे माजी सरपंच अनंता ठाकरे तसेच मोठ्या संख्येने भोलेनाथ भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.



