गडचिरोलीविदर्भ

धानोरात अवैध दारू अड्ड्यावर धाड ; देशी-विदेशी दारू जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल

गडचिरोली : धानोरा शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात धानोरा पोलीस आणि मुक्तीपथच्या पथकाने संयुक्त कारवाई करत धाड टाकली. या कारवाईत ६ हजार ९३० रुपये किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरा शहरातील एका घरातून छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्तीपथ टीमसह संशयित विक्रेत्याच्या घरावर छापा टाकला. झडती दरम्यान पोलिसांनी देशी दारू १९ बाटल्या, विदेशी दारू १६ बाटल्या असा एकूण ६,९३० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून दारू बंदी कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.पोलिसांना यापुढेही अवैध दारू विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली असून, अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असे संकेत दिले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भजनराव गावडे, पोलीस शिपाई प्रवीण राऊत, राहुल वनकर यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, उपसंघटक भास्कर कड्यामी, प्रेरक नरेश मोहर्ले आणि मयुरी चिचघरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button