
भंडारा : हरीत चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अमृतवृक्ष योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये चकारा, (अडयाळ) येथे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आले.
अमृतवृक्ष योजनेसाठी मोफत रोपे व रोपांच्या उपलब्धेतसाठी वनमहोत्सव केंद्र उघडण्यात आले. यामध्ये सामाजिक वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये अमृतवृक्ष मोबाईल ॲप वरही ही माहिती देण्यात येत आहे. या योजनेत ३० जुलै व 7 ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हयात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.



