महाराष्ट्रमुंबई

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार

मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर रोजी, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मतदार यादीतील त्रुटींवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ ही तारीख मतदार यादीसाठी निश्चित केली आहे. याच तारखेनुसार अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. प्रारुप यादी प्रसिद्धी: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार विभागानुसार प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचना: या यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम यादी: अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील नावे समाविष्ट करणे, वगळणे किंवा पत्ते दुरुस्त करणे यासारख्या गोष्टी आयोगाकडून केल्या जाणार नाहीत. हरकती व सूचनांमध्ये केवळ मतदार याद्यांच्या विभाजनातील लिपिकीय चुका, मतदाराचा चुकीचा विभाग किंवा गण, किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे यासारख्या दुरुस्त्यांचा विचार केला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button