गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अविश्वास पारित ; अहेरी कृउबासच्या सभापती पदावरून कंकडालवार पायउतार

अहेरी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जि. प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र, अवघ्या काही कालावधीत त्यांच्या कार्यप्रणालीवर संचालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत अविश्वास ठराव पारित केला. यामुळे कंकडालवार यांना खूप मोठा झटका बसला आहे.

एप्रिल २०२३ मध्ये अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली होती. १८ सदस्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर कंकडालवार यांनी स्वतः दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी १० विरुद्ध ७ अशी एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. दरम्यान, त्यांनी एका ठिकाणी राजीनामा दिला होता. आता येथे १७ सदस्य संख्या होती. सत्ता स्थापन करतेवेळेस १० विरूद्ध ७ अशी स्थिती होती. मात्र, अवघ्या काही कालावधीतच त्यांच्या सभापती पदावर नाराज असलेल्या सदस्यांनी अविश्वास ठराव पारित करत आता १० विरूद्ध ५ अशी स्थिती निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या गटाकडून निवडून आलेले रवींद्रबाबा आत्राम (उपसभापती), राकेश कुळमेथे, अनिल कर्मकार, मलुबाई ईश्टाम, सैनू आत्राम या सदस्यांनी त्यांना नाकारले असून, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटात सामील झाले आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button