चंद्रपूरविदर्भ

लोखंडी गेट अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू

नातेवाईकाच्या घरी खेळत असताना घडली घटना

सावली : नातेवाईकाच्या घरी खेळत असताना अंगावर लोखंडी गेट पडल्याने बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १४) सकाळी उघडकीस आली. अमूल्या मुकेश शिंगाडे (९, रा. सावली) असे मृतक बालिकेचे नाव आहे. ती राणी यशोधरा कान्व्हेंटमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होती.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत मुकेश शिंगाडे हे पत्नी व मुलांसह विवाह सोहळ्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील तेजापूर येथे नातेवाईकाच्या घरी गेले होते. सोबत अमूल्यादेखील होती. सकाळी नातेवाईकाच्या अंगात खेळत असताना तिच्या अंगावर लोखंडी गेट कोसळला. त्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तत्काळ वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अमूल्याचा मृतदेह सोमवारी (दि. १४) दुपारी सावली येथे आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button