गडचिरोलीविदर्भ

कोरचीत भाजप युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी जाहीर

कोरची : भाजप युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी कोरची तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोदकुमार भारत कोरेटी यांनी सर्वसमावेशक नेतृत्वाला संधी देत ही नवी टीम घोषित केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी आगामी काळात पक्षाचे काम अधिक गतीमान करणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

या नवीन कार्यकारिणीत अनेक तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देऊन पक्षाला बळकट करण्याची संधी देण्यात आली आहे. तालुकाध्यपदी विनोदकुमार कोरेटी यांची निवड करण्यात आली आहे. तर महामंत्री प्रशांत कराडे, विजय उईके, उपाध्यक्ष अविनाश हारामी, खिलेश बागडेरिया, सत्यवान मेश्राम, योगेश धमगाये, सचिव कवेलशिंग धुर्वे, अर्जुन मुलेटी, अंकुश कुमरे, राजकुमार गुरूपंचांग, कोषाध्यक्ष शालिक सोरी, सदस्य म्हणून बरन नैताम, योगेश चौधरी, जोहारलाल कोरेटी, पुरषोतम कोल्हे, पंकज बघवा, मैनूराम ताडामी, सुरेश सारवे, रुपशिंग बोगा, नंदेश्वर भेळी, राकेश ढेक, हितेश कोसारे, पवन मेश्राम, तेंद्र वाळदे, दीपक नायक, उसेंद्र बिच्छी, सुरेश गुर्भेलिया, योगेश पुळो यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी जाहीर करताना तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यातून भाजप युवा मोर्चाच्या वाढत्या ताकदीचे संकेत मिळत आहेत. ही नवी टीम कोरची तालुक्यात पक्षाचा विस्तार आणि युवा शक्तीला एकत्र आणण्यासाठी काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button