
नगराध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते सत्कार
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी रवी सुलतान यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष वासेकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. सुलतान हे डॉ. आत्राम यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
रवी सुलतान यांच्या निवडीनंतर तालुका स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोउत्साह दिसून येत आहे. सिरोंचा नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी सुलतान यांच्या निवडीबद्दल त्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन नगर पंचायत कार्यालयात सत्कार केला.
यावेळी राजू बंदेला, नागेश दुग्याला, मारुती गणपूरपू, शैलेंदर मृत्याला, सतीश योगोलपू, प्रणित मारगोणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुलतान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



