गडचिरोलीविदर्भ

15 हजाराची विदेशी दारू जप्त ; महिला दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

आठवडी बाजार परिसरात पोलिस आणि मुक्तिपथची संयुक्त कारवाई

गडचिरोली : शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या एका घरी धाड टाकून १५ हजार ६०० रुपयांची विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली आहे. याप्रकरणी लता चापले नामक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गडचिरोली शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दारू विक्रेत्यांवर पोलीस विभागातर्फे पाळत ठेवून कारवाई केली जात आहे. शहरातील विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु असून विविध वार्डातील विक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आठवडी बाजार परिसरात एक महिला दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संबंधित विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून तपासणी केली असता, १५ हजार ६०० रुपयांची विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी पंचनामा करून लता चापले या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनखाली डीबी पथकाचे पिएसआय शिवाजी देशमुख, पोलीस कर्मचारी गोविंद केकान, राजू कळंबे, अर्पणा ठलील यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे संघटक रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन तालुका प्रेरक, पल्लवी पेटकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button