क्राईमवणीविदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल

वणी : शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्याशी भेटणे बोलणे बंद केले व लग्नास नकार दिला. शेवटी पीडितेने याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पीडिता ही शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. यादरम्यान तिची बोर्डा गावात राहणाऱ्या प्रणय लक्ष्मण मडावी (२२) या युवकाशी ओळख झाली. हळूहळू बोलणे सुरू झाले. मोबाईल नंबर एकमेकांना दिल्या गेले. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रणयने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून स्वप्न दाखविले. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी प्रणयने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मात्र प्रणयने तिच्याशी भेटणे व बोलणे बंद केले. पीडितेला ही बाब लक्षात आल्यावर तिने याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी प्रणयविरुद्ध कलम ६४ (२) ४, ६ पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे. मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची फसवणूक करण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button