क्राईमगडचिरोलीविदर्भ

मुरूमबोडीत एक लाखांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

गडचिरोली : तालुका सीमेवर असलेल्या मुरूमबोडी शेतशिवारात शोधमोहीम राबवित 1 लाखाचा मोहफुलाचा सडवा, साहित्य व दारू नष्ट केल्याची कृती मुक्तीपथ धानोरा, गडचिरोली टीम व गाव संघटनेने संयुक्तरीत्या केली.

मुरूमबोडी गावात मोठ्या प्रमाणात मोहाफुलाची दारू काढून विक्री केली जाते. तसेच देशी विदेशी दारू सुद्धा विक्री केली जाते. गडचिरोली मुख्यालयापासून 16 किमी अंतरावर असलेल्या या गावात 30 ते 40 व्यक्ती दारू गाळून विक्री करतात व किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करतात. तसेच सभोवतालच्या 10 गावातील आजूबाजूचे लोक सायंकाळी, सकाळी दारू पिण्यासाठी विक्रेत्यांच्या घरापुढे गर्दी करतात. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आले आहे. युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे.  अशातच गाव संघटन यांचे गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली व धानोरा टीमने शेत शिवारात शोधमोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोहफुलाचा सडवा, दारू, साहित्य असा एकूण जवळपास एक लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button