आरोग्यगोंदियाविदर्भ

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत मिसपिरी येथे आरोग्य मेळावा

४९ गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट ; आरोग्य तपासणी व जनजागृती

गोंदिया : जिल्ह्यात ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ ४९ गावांमध्ये राबवण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवरील लोकांना मिळवून देणे हा आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मिसपिरी गावात २५ जून रोजी ग्रामपंचायत मिसपिरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी यांच्यामार्फत आरोग्य मेळावा व जनजागृती शिबीर संपन्न झाले.

२५ जून रोजी ग्रामपंचायत मिसपिरी येथे आयोजित ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन देवरी पंचायत समिती सदस्य अनुसया सलामे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्राम मिसपिरीचे सरपंच रसवंती उसेंडी, उपसरपंच जीवन सलामे, ग्रामसेवक अंबादे, प्रा. आ. केंद्र ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके, भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कुकडे, आरोग्य सेविका एस.एस. थोटे व एम.आर. लंजे, आरोग्य सेवक एस.एस. टेंभुर्णे, तसेच कार्यक्षेत्रातील आशा गटप्रवर्तक व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सर्वांनी आरोग्य सेवा प्रदान करण्यात सक्रिय सहभाग घेतला.

या आरोग्य मेळाव्यात शासनाच्या सर्व विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीच्या वतीने आरोग्य विभागाचा विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवर रक्तदाब व मधुमेह तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तगट तपासणी यांसारख्या अंसासर्गिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. गरजू लोकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करून समुपदेशन व औषधोपचारही करण्यात आला.

आरोग्य विभागाच्या जनजागृती स्टॉलमध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, हिवताप (मलेरिया), स्टॉप डायरिया आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रमांचे बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके यांनी याप्रसंगी दिली. या अभियानामुळे दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button