गडचिरोलीविदर्भ

चंद्रपूर-बल्लारपूर-गडचिरोली-गोंदिया येथून थेट हावडाकरिता रेल्वे सुरू करा

मतुआ महासंघ महाराष्ट्र राज्य व बंगाली समाज जनअधिकार संघर्ष समितीची मागणी

गडचिरोली : बंगाली समाज जनधिकार संघर्ष समिती व मतुआ महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांचे पुढाकाराने चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर येथे वार्षिक मतूवा महासंघाचे संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात विदर्भातील विविध ठिकाणातील मतूआ समाज भाविक भक्त सहभागी झाले होते. विविध प्रांतातील गोसाई गोविंद यांनी मार्गदर्शन केले व स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होऊन मतुवा धार्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी प्रामुख्याने मतूआ महासंघ व बंगाली समाज जनअधिकार संघर्ष समितीचे वतीने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे व जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. मतूआ महासंघाच्या वतीने चंद्रपूर-बल्लारपूर-गडचिरोली-गोंदिया ते हावडा पर्यंत थेट रेल्वेगाडी सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सदर मागणी केली जात आहे. परंतु केंद्र सरकारने अजून पर्यंत या मागणीचा विचार केला नाही असे विचार संघटनेद्वारे मांडण्यात आले व डॉ. प्रणयभाऊ खुणे यांना सदर मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी डॉ. प्रणय खुणे यांनी सदर मागणीची दखल घेतली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सदर मागणी केंद्राकडे करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी बंगाली समाज जनधिकार संघर्ष समिती मुख्य संयोजक डॉ. सत्यजित पोद्दार, पदाधिकारी गोविंद मंडल, दीपक अधिकारी, डॉ. विश्वजीत विश्वास, फणीभूषण मंडल, डॉ. दिनेश मंडल, शोभा अधिकारी तसेच पदाधिकारी/कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button