
सीए अनिकेत अग्रवाल आणि व्यावसायिक हरीश गांधी यांनी दिले कर नियम व व्यवहारिक टिप्स
चामोर्शी : भारतीय जनता पार्टी, चामोर्शीच्या वतीने कर्तव्य कक्ष २ येथे वस्तू व सेवा कर (GST) या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा उद्देश नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये कर साक्षरता वाढवणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवणे हा होता.
या मार्गदर्शनपर बैठकीत दोन तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीए अनिकेत अग्रवाल यांनी जीएसटीच्या नियमावली, नोंदणी प्रक्रिया आणि कर भरण्याबद्दल सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. व्यापारी हरिश गांधी यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवातून व्यापाऱ्यांसाठी व्यवहारिक टिप्स आणि प्रभावी मार्गदर्शन केले. यामुळे उपस्थित नागरिक आणि व्यापाऱ्यांना जीएसटीच्या अंमलबजावणीतील बारकावे समजून घेता आले.
या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा उपाध्यक्ष आनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर भुरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेश अलसावार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कविता किरमे, तालुका महामंत्री शेषराव कोहळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



