गडचिरोलीविदर्भ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रेट्रोफिटिंग कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश

गडचिरोली : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या रेट्रोफिटिंग कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण २८ कोटी रुपयांपैकी हा निधी तातडीने मंजूर झाल्याने महाविद्यालयाच्या अपूर्ण कामांना गती मिळणार आहे.

गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यापासून ते त्यासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करण्यापर्यंत डॉ. देवराव होळी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यापूर्वीही, काही तांत्रिक अडचणींमुळे महाविद्यालयासाठी मंजूर झालेला निधी रखडला होता. ही बाब लक्षात आल्यावर डॉ. होळी यांनी २५ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने तात्काळ ४७१.४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

आता एमबीबीएसच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी आवश्यक विविध विभाग स्थापित करण्यासाठी रेट्रोफिटिंगच्या कामांसाठी उर्वरित २८ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

निधी मंजूर केल्याबद्दल डॉ. होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button