गडचिरोलीविदर्भ

काँग्रेसची संघटनात्मक नियोजन बैठक ; आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्राची एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियोजन बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली.

बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षशिस्तीचा आदर्श पाळत, एकजुटीने काम करत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात पुन्हा मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस पक्षाचे राज्य निरीक्षक ॲड. सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुड्डेवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, घनश्याम वाढई, विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, जितेंद्र मूनघाटे, रवींद्र सुरपाम, दिवाकर निसार, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, योगेंद्र झंझाड, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, अनिल कोठारे, रमेश मूनरत्तीवार, सुधीर मडावी, सुधीर बांबोळे, कुसुम आलाम, कल्पना नांदेश्वर, मंगला करंगामी, जनाबाई परसें, शालिनी पेंदाम, कविता उराडे, रिता गोवर्धन, पूनम किरंगे, सुनीता रायपूरे, शेवंता हलामी, महेश जिल्लेवार, खुमेश हर्षे, सौरभ झंझाड, दिगंबर धानोरकर, गंगाधर शेडमाके, फाल्गुन निकुरे, गुणाजी देशमुख, तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, धानोरा व चामोर्शी तालुक्यांतील विविध काँग्रेस पदाधिकारी, शहर व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button