गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अविश्रांत, अविरतपणे कार्य करणारे एकमेव नेते : मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम

न थकता, अविश्रांत व अविरत कार्य करणारे विदर्भातील एकमेव नेते म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील लोकराजे, लोकनेते ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब हे असून, मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा आज रविवार, 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा!

खरे तर मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना राजघराण्याचा वारसा लाभला असले तरी जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम, संघर्ष करूनच खऱ्या अर्थाने “लोकराजे व लोकनेते” बनले. महाराष्ट्र राज्याच्या पटलावर एक वेगळी व अमिट छाप उमटविले.

मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचे ‘ग्रास रुटिंग’ (ग्राम पंचायत/पंचायत समिती) पासून राजकीय जीवनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कसलेले, मुरब्बी, अनुभवी  नेते अशी ओळख असल्याने विधानसभेत बाजी मारले की हमखास मंत्रीपद त्यांच्या वाट्याला येणे हे क्रमप्राप्त झाले. नव्हे;  एकप्रकारे ‘सूत्रच’ बनले आहे.

मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना कोणत्याही खात्याचे मंत्री बनविले तरी ते लीलया पेलण्यात समर्थ व सक्षम असतात. मंत्री पद मिळताना सर्वांना आवडत्या खात्याकडे विशेष लक्ष असते, पण मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब त्यासाठी अपवाद आहेत. उलट एखादे खाते त्यात कोणतेही मोठ्या स्वरूपात तरतूद (बजेट) नसले तरी त्या खात्याला खऱ्या अर्थाने कार्यान्वित करण्याचे धोरण राबवून न्याय देत असतात.

मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे असून अविरतपणे कार्य करणे हाच त्यांचा ध्यास आहे. मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी राजकीय कारकीर्द संघर्ष व परिश्रमातून साकारली असून चिकाटी, जिद्द, परिश्रम करण्याची तयारी असली की यशाची पायरी सहज गठता येते हेच मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम कार्यातून प्रकर्षाने जाणवते.

अविकसित व आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात किंबहुना अहेरी उपविभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी पेटविली आहे. त्यांना आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा, चालीरीती, संस्कृती आदींची जाणीव अधिक असल्याने एक मुरब्बी व दांडगा अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांनी समाजाची खरी नाळ ओळखली असून मूलभूत सोयीसुविधेसोबतच आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांचे अखंडीतपणे कार्य सुरू आहे. शिक्षण, सिंचन, आरोग्य हे ब्रीद घेऊनच राजकीय मैदानात पाऊल टाकले असून हे त्रिसूत्री मिशन राबविण्यात ते यशस्वीही झाले.

या त्रिसूत्री मिशन नंतर आता सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात लोह उत्खनन उभारण्यासाठी हिरहिरीने व पोटतिडकीने पुढाकार घेऊन सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम प्राप्त करून दिले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे हेरून पिताश्री स्व. भगवंतराव महाराज यांच्या नावाने भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेची स्थापना करून विद्यादानाचेही पावित्र्य कार्य करीत आहेत.

त्यांच्या शब्दकोशात घमंड व गर्विष्ठ शब्दच नाही, पदाचाही कधी आव आणू नये असे ते नेहमी म्हणत असतात. पद आज आहे, उद्या नाही. या विचारांमुळे त्यांच्याकडे पदे आपोआप येत असतात. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ अशी खूणगाठ मनात बाळगून ते जनसेवा करीत असल्याने मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब असंख्यांचे गळ्यातील ताईत बनले आहेत. आजच्या वाढदिवशी मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम साहेब याना खूप साऱ्या शुभेच्छा!

जीत के खातिर बस्स जूनून चाहिए!                                                 जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिये!                                                      यह आसमान भी आयेगा जमीन पर                                                   बस्स इरादों मे जीत की गुंज चाहीये

वाढदिवस विशेष

✍️ सुरेंद्र अलोणे, अहेरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button