क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

वाहनचोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

विविध गुन्ह्यातील 3.15 लाखांच्या 09 दुचाकी जप्त

गडचिरोली : गडचिरोलीसह छत्तीसगड येथे विविध वाहन चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. प्रदीपकुमार फुलसिंग कोडापे (वय 19) रा. टेमली ता. मोहल्ला, जि. मानपूर-मोहल्ला (छ.ग.) व टेमनलाल रामखिलावन साहू (वय 19) रा. चिलमगोटा ता. दौंडी लोहारा, जि. बालोद (छ.ग.) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील ९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी पोस्टे कोटगुल येथे वाहन चोरीबाबात २४ मार्च रोजी कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. 02/2025 गुन्हा दाखल केलेला होता. पण त्यातील आरोपींचा शोध लागलेला नव्हता. सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना सिसिटीव्ही फुटेजच्या मदतीने 25 मार्च रोजी पो. स्टे. कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे यांनी आरोपी प्रदीपकुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटविली होती. त्यानंतर गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे टेमली (छ.ग.) येथून आरोपी प्रदीप कोडापे याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विचारपूस केली असता, आरोपीने व त्याचा साथीदार टेमनलाल साहू यांनी मिळून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले मोटारसायकल वाहन क्र. सी.जी-07-बी.व्ही-5653, किंमत अंदाजे 30,000/- रु. चोरी केली असल्याचे आरोपीने कबूल केले होते. यानंतर 25 मार्च रोजी दोन्ही आरोपीस पोस्टे कोटगुल पोलीसांनी अटक करुन न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

यादरम्यान आरोपींना विश्वासात घेवून गुन्ह्याच्या संदर्भाने अधिकची विचारपूस केली असता, पोस्टे कोटगुल येथे दाखल अप. क्र. 002/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं. सह 1) पोस्टे कोरची येथे दाखल अप.क्र. 0029/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं., 2) छत्तीसगडमधील पोस्टे बसंतपूर येथे दाखल अप.क्र. 0097/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. असे गुन्हे उघडकीस येऊन या गुन्ह्यातील एकुण 03 दुचाकींसह इतर 06 दुचाकी अशा एकुण 09 दुचाकी किंमत अंदाजे 3 लाख 15 हजार आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. पोस्टे कोटगुल पोलीसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे सदर गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोपोउपनि. दयानंद शिंदे हे करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात पोउपनि. दयानंद शिंदे व पोहवा भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोअं विनय सिध्दगु, किशोर बावणे, अनिल मडावी यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button