
आ. सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विमाशी संघाची शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा
गोंदिया : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा २९ मे रोजी समाज कल्याण सभागृह, गोेंदिया येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत एका अनुकंपा प्रकरणास “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले.
‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘वि.मा.शि. संघा’च्या उपक्रमांतर्गत सभेत सुरुवातीला माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने कु. लिना वाल्मिकराव वाघ (श्रीमती लिना नितीन नारनवरे) यांना अनुकंपा तत्त्वाअंतर्गत शहिद मिश्रा हायस्कूल तिरोडा येथे परिचर सेवक प्रस्तावास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली.
माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले.
यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. महेंद्र गजभिये, वेतन पथक अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे, सल्लागार रतन वासनिक, मार्गदर्शक दिनेश बहेकार, अशोक नागपुरे, सूर्यकांत केंद्रे, अजय भिवगडे, सी.एस. बोपचे, निशा ढोके, डी. एस. हुकरे, वराडे, गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, आर. पी. देशपांडे, आय. टी. निनावे, आर. एम. रामटेके, सुभाष महरवाडे, संजय उइके, संजय कटरे, चौधरी मॅडम, भुवन बिसेन, तोमेस पारधी, विज्युुक्टा जिल्हाध्यक्ष पवन कटरे, वंजारी, येळणे, खोब्रागडे, विदर्भ शिक्षक संघाचे विनोद चव्हाण, शेखर भालाधरे, प्रदीप राठोड, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लवकरच समस्या निवारण सभा घेण्यात येईल, तोपर्यंत प्राथमिक विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिले.



