चंद्रपूरविदर्भ

एसबीसी अन्याय निवारण कृती समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. बंडू आकनुरवार व जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. अनंत बल्लेवार यांची नियुक्ती

चंद्रपूर : विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य ही संघटना एसबीसी प्रवर्गातील मागण्या शासन स्तरावर मंजुर करण्यासाठी प्रयत्न/पाठपुरावा करणारी सामाजिक संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी राज्य उपाध्यक्षपदी डॉ. बंडूभाऊ आकनुरवार व जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. अंनत बल्लेवार यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. बंडूभाऊ आकनुरवार चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटनेचे तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, पद्मशाली फाऊंडेशनचे संचालक आहेत. ते कास्ट्राईब कर्मचारी महासंघ पशुसंवर्धनचे राज्य उपाध्यक्ष असून गेल्या 25 -28 वर्षापासून समाज, कर्मचारी संघटना, सामाजिक व ग्रामीण विकास व समाज, एसबीसी प्रवर्ग बांधवाना प्रबोधन करीत आहेत. तसेच अ‍ॅड. अंनत बल्लेवार समाज संघटना व विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, मुल पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष, उच्चविद्या विभूषित एसएमसी, बिएड, एलएलबी निवृत्त मुख्याध्यापक असुन चंद्रपूर, मुल, सावली, सिंदेवाही येथे वकीली करीत असून गेल्या 20 वर्षापासून समाज जागृती, प्रबोधनाचे कार्य करीत आहे.

त्यांचे नियुक्तीबद्दल शेकडो समाज व एसबीसी प्रवर्गातील बांधव व मित्र मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button