क्राईमगडचिरोलीविदर्भ

१२ लाख रुपयांची देशी दारू जप्त ; दोघांना अटक

आष्टी पोलिसांची कारवाई

गडचिरोली : चंद्रपूर ते आष्टी मार्गावर एका कथ्या रंगाच्या वाहनाने जिल्ह्यामध्ये देशी दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाणे आष्टीच्या कर्मचाऱ्यांनी फॉरेस्ट नाका आष्टी येथे नाकाबंदी केली असता, वाहन क्रमांक एमएच ४० वाय १९०५ या वाहनात १२ लाख रुपयांची देशी दारू आढळून आली. सोबत १० लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. राजेश फुलनसिंग यादव (२७), अमोल बाजीराव मैस्कर (३५) रा. आलापल्ली यांना अटक करण्यात आली.

सदर कारवाही आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस उपनिरीक्षक मानकर, पोलिस उपनिरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक वणवे, पोलिस हवालदार मडावी, पोलिस हवालदार करमे, पोलिस नाईक सडमेक, पोलिस शिपाई डोंगरे, पोलिस शिपाई तोडासे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button