
अहेरी : पद्मशाली समाजातील सर्व समस्या दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. ,येणाऱ्या काळात पद्मशाली समाजातील अनेक विषय आहेत ते पूर्ण करणार असा मी शब्द देतो आणि पद्मशाली समाजाला कधीच अडचण होऊ देणार नाही. तुमच्या समाजातील समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो. समाज संघटित झाला पाहिजे आणि संघटनात्मक बांधणीतून समाजाचा सर्वांगीण विकास होतो असे मत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील आलापल्ली शहरातील मार्कडेश्वर मंदीर येथे पद्मशाली समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते. अम्ब्रीशराव आत्राम यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतला. आलापल्ली येथील सर्व पद्मशाली समाजातील बांधवांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पसपुंनूवार, उपाध्यक्ष मधुकर कोंगावार, सचिव जीतेन्द्र ओडपल्लिवार, समय्या जलारापवार, व्यंकटेश इगावार, जगदिश जरापवार, निंतीन ओडपल्लिवार, दशरथ अडगोपुलवार, नरेश बोमावार, सुनील येन्नामवार, राणी अडगोपुलवार, कलावती पसपुंनूवार आणि मोठ्या संख्येने पद्मशाली समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.



