गडचिरोलीविदर्भ

अहेरीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सात नगरसेवक अपात्र 

अहेरी : कधी निविदा प्रक्रियेत घोळ, कधी मुख्याधिकारी – पदाधिकारी वाद, तर कधी नगरसेवकांची बंडखोरी अशा विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहेरी येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सात नगरसेवक अशा एकूण आठजणांना २४ डिसेंबरला जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अपात्र ठरवले. सत्ताधारी गटाचे व काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याने या सर्वांना पायउतार व्हावे लागले.

नगराध्यक्षा रोजा करपेत, उपनगराध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नौरास रियाज शेख, मीना ऑडरे, नगरसेवक विलास गलबले, विलास सिडाम, महेश बाकेवार अशी अपात्रेची कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. यापैकी काहीजण काँग्रेसच्या अजय कंकडालवार यांच्या गटाचे तर काही जण सध्या राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आहेत. भाजपच्या वॉर्ड क्र. १५ मधील नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५चे कलम ४४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता. अहेरी नगरपंचायत सभागृहात ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वसाधारण सभा पार पडली, यात वॉर्ड क्र. १० मध्ये अजय कंकडालवार यांनी नगर भूमापन क्र. ७८० व ७६६ मध्ये सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या बांधकाम केल्याचा आरोप केला होता. या बांधकामाला या सभेत समर्थन देण्यात आले, तसा ठरावही पारित केला.

नगरसेविका पोहनेकर यांच्या आक्षेपावर १७ जानेवारी २०२३ रोजी पहिल्यांचा या सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कंकडालवार यांना बांधकाम परवानगी पत्र व जागेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले; पण लेखी नोटीस दिल्यानंतरही कंकडालवार यांनी माहिती सादर केली नाही. यानंतर मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. मुख्याधिकाऱ्यांनी अजय कंकडालवार यांनी परवानगी न घेता व अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा अभिप्राय अहवालात दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button