गडचिरोलीविदर्भ

गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

घोट गटग्रामपंचायत अंतर्गत कुर्दुळ येथील घटना

चामोर्शी : तालुक्यातील घोट गटग्रामपंचायत अंतर्गत कुर्दुळ येथे एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. ऋती अनिल पचारे (१७, रा. कर्दळ (घोट) असे मयत मुलीचे नाव आहे.

तिचे वडील अनिल पचारे यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ऋती व घरातील सर्व जण ३ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून ओठ्यावर बसले होते. त्यावेळेस ऋती ही मोबाइलवर काहीतरी पाहते म्हणून घरात गेली. काही वेळाने लहान बहीण अनुष्का ही घरात गेली असता तिला ऋती ही घराच्या आळ्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिने कुटुंबीयाला माहिती दिली. तिला फासावरून उतरविले, पण त्याआधीच मृत्यू झाला होता. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. तपास सहायक निरीक्षक नीलेश गोहणे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button