गडचिरोलीविदर्भ

पदवीधर मतदार नोंदणीला गती देण्यासाठी गडचिरोलीत भाजपची आढावा बैठक

माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वात प्रभावी नियोजनावर भर

गडचिरोली : आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त पदवीधर मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीचे नेतृत्व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले. यावेळी सुधिर दिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जागरूकता मोहिमा आणि मतदार याद्यांतील नावनोंदणीसाठी केलेली संघटनात्मक तयारी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. डॉ. अशोक नेते यांनी आगामी निवडणुकीत पदवीधर वर्गाचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी नियोजनाचे मार्गदर्शन केले.

बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा व गीता हिंगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, कि.मो. जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दता, महेश झरकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. पदवीधर मतदार नोंदणीबाबत जनजागृतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button