क्राईमगडचिरोलीविदर्भ

सेमल लाकडाची तस्करी ; एका आरोपीस अटक

वनविभागाची कारवाई

एटापल्ली : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली अंतर्गत जीजावंडीच्या जंगलातून सेमल (सावर) लाकडाच्या तस्करी प्रकरणात वनविभागाने एका आरोपीला अटक केली आहे. मिहीर निमाई दत्ता रा. पाखंजूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.

मागील आठवड्यात जिजावंडी येथे सेमल लाकडाने भरलेला ट्रक पकडण्यात आला. पकडण्यात आलेल्या ट्रकला आरोपींनी रात्रभरात पळविले. पाखंजूर येथे नेण्यात आले. यानंतर वनविभागाच्या ताफ्याने पाखंजूर येथे जाऊन ट्रक जप्त केला. सदर ट्रक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली येथे आणला. या प्रकरणात चार आरोपी असल्याचे वनविभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दोन आरोपी पाखंजूर येथील तर दोन आरोपी विकासपल्ली येथील आहेत. एक आरोपी मिहीर निमाई दत्ता याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. मिहीर दत्ता याला पकडण्यात आल्यामुळे सेमल लाकडाच्या तस्करीचे कोडे उलगडणार आहे.

सामान्यपणे मोठी किंमत मिळते म्हणून सागवान लाकडाची तस्करी करण्यात येत असल्याचे दिसते. पहिल्यांदाच सेमल (सावर) या लाकडाच्या तस्करीचे प्रकरण पुढे आले. काहींच्या मते प्लायवूडसाठी, काहींच्या मते औषधी गुणधर्मासाठीतर काहींच्या मते इमारत बांधकामासाठी या लाकडाचा उपयोग होतो. आरोपीला उद्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहेरी येथे उपस्थित केले जाणार असून वन विभागाकडून वनकोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

आरोपीच्या चौकशी नंतर सेमल लाकडाच्या तस्करीचा उलगडा होईल व उर्वरित आरोपींचा माग काढणे वनविभागाला सोपे जाईल असे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button