गडचिरोलीविदर्भ

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती सायकल रॅली

गडचिरोली : १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वतीने जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!” या घोषवाक्याखाली ही रॅली सकाळी ८.३० वाजता काढण्यात आली.

जिल्हा महिला व बाल रुग्णालयातून सुरू झालेली ही सायकल रॅली कारगिल चौक मार्गे पुन्हा रुग्णालयात येऊन समारोप करण्यात आला. या रॅलीद्वारे एचआयव्ही/एड्स प्रतिबंध आणि उपचारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी एचआयव्ही/एड्स संबंधित पथनाट्य सादर केले, ज्यामुळे हा विषय अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, डॉ. मेश्राम, डॉ. नागदेवते, डॉ. प्रशांत पेदांम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिषेक गव्हारे, महेश भांडेकर (जिल्हा कार्यक्रम अधिकारी) प्रा. चरडे,कबिर निकुरे, शासकिय नर्सींग स्कुल, फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाईफुले नर्सींग स्कुल, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा एड्सनियंत्रण व प्रतिबंध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या मार्गदर्शनात एचआयव्ही/एड्स संबंधित जिल्हास्तरावरील आकडेवारी, तपासणी केंद्रे आणि एआरटी (ART) सेंटर याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी नागरिकांना तपासणी आणि उपचारांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अभिषेक गव्हारे आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य व राजेश गोंडाने यांनी केले तर रामटेके यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button