
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वडसा वन विभागातील सूर्यडोंगरी शिवारात रानटी हत्तींनी केलेल्या मका पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी. आर. यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सुर्यडोंगरी शिवारात १८ मार्च २०२५ रोजी हत्तींनी देविदास बालाजी मेश्राम यांच्या शेतात मक्याचे नुकसान केले. त्यांना पोर्ला वन परिक्षेत्रामधील कर्मचारी, कृषी सहायक, तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करून वडसा वनविभागास प्रकरण सादर केले. वन विभागाच्या उपवनसंरक्षक वडसा कार्यालयने 26 मार्च रोजी शेतकरी मेश्राम यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
तसेच, वडसा वनविभागाकडून शेतपिक नुकसान भरपाई प्रकरणे योग्य त्या शासन निर्णयांना अनुसरुन लवकरात लवकर अदा करण्यात येत आहेत, असे उपवनसंरक्षक वरूण बी. आर. यांनी कळविले आहे.



