
तनुश्री आत्राम यांची प्रमुख उपस्थिती ; महिलांच्या समस्यांवर झाली चर्चा
अहेरी : तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतीच महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या विशेष ग्रामसभेमध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या आरोग्यासंबंधी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सरपंच रजनिता मडावी यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
या ग्रामसभेदरम्यान गरजू स्तनदा माता, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या महत्वपूर्ण सभेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, माजी सरपंच सांभया करपेत, सारिका गडपल्लीवार, अंगणवाडी सेविका विठाबाई भट, ग्रामपंचायत सदस्य माया आईलवार, व्यंकटेश कडार्लावार, महिला बचत गटप्रमुख भारती भट, आशा गटप्रवर्तक विद्या येजुलवार, पंचफुला गोदारी, इर्शाद शेख, कैलास कोडापे, दिनेश अरगेली, महेश अडचर्लावार, रुपेश पेनकुल यांच्यासह गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या समस्या व त्यांच्या सक्षमीकरणासाठी या ग्रामसभेत उपयुक्त चर्चा झाली.



