
दारूविक्री केल्यास 10 हजारांचा दंड
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गाव म्हणून ओळख असलेल्या दोड्डी गावात मुक्तिपथ तर्फे सघन गाव भेटीदरम्यान विविध व्यसनविरोधी उपक्रम राबविण्यात आले. आता आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचा ठराव ग्रामस्थांनी घेतला असून चोरट्या मार्गाने दारूविक्री करताना आढळून आल्यास 10 हजारांचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे. तसेच आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 55 जणांनी सहभाग घेत शक्तिप्रदर्शन केले.
एटापल्ली मुक्तिपथ तालुका टीमने अतिदुर्गम भागात वसलेल्या दोड्डी गावात भेट देऊन अवैध दारूविक्री बाबत परिस्थिती जाणून घेतली. ग्राम सभेचे आयोजन करून व्यसनाचे प्रमाण कमी झाल्याशिवाय गाव विकास अशक्य असल्याची बाब ग्रामस्थांना पटवून दिली. त्यानंतर ग्रामस्थानी एकमताने खर्रा व दारू विक्रीबंदीचा ठराव पारित केला. सोबतच गावात कोणी दारू विक्री केला तर 10 हजार रुपये दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीसाठी गाव संघटना सक्रीय करण्यात आली. सोबतच मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून 55 जणांनी सहभाग घेत अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी तयारी दर्शविली. तसेच मुक्तीपथ शक्तिपथ स्त्री संघटना पाठपुरावा बैठक घेत 69 महिलाना टॉनिकचे गोळ्या देण्यात आले. आपल्या मुलांना तंबाखूपासून वाचवा कार्यक्रम घेत जागृती करण्यात आली.
यावेळी गाव भूमिया किशोर रापांजी, अंगणवाडी सेविका सिंधू नरोटे, आशा कार्यकर्ती रोशनी गावडे, शक्तिपथ स्त्री संघटना सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.



