भंडाराविदर्भ

बीएलओ, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांची मतदान जागृती समन्वय सभा

एसव्हीईईपी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांचा पुढाकार

भंडारा : पोलीस बहुउद्देशीय सभागृह भंडारा येथे तालुकास्तरीय बीएलओ, पर्यवेक्षक, ग्रामसेवक व तलाठी यांची मतदान जागृती समन्वय सभा पार पडली. या सभेला एसव्हीईईपी जिल्हा नोडल अधिकारी रविंद्र सलामे, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा करण चव्हाण, बीडीओ पंचायत समिती भंडारा डॉ. संघमित्रा कोल्हे, नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, घनश्याम सोनकुसरे, एसव्हीईईपी सहायक नोडल अरुण मरगडे, विनोद किंदले, सुनील सावरकर, श्रीकांत वैरागडे, अमित वैद्य, जिल्हा आयकॉन रोहित उईके, प्रामुख्याने उपस्थित होते.

सभेमध्ये बीएजी, चुनाव पाठशाळा, यांचे महत्त्व समजून सांगण्यात आले. गाव पातळीवर मतदान जागृती उत्कृष्टरित्या होण्यासाठी सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी यांनी समन्वय साधून मतदान जागृती करावी. येणाऱ्या विधानसभेत मतदार मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत कसे पोहोचतील व लोकशाहीला कसे बळकट करतील यासाठी जिल्हास्तरावरून मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button