गडचिरोलीविदर्भ

१५ ऑक्टोबरला आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा ; धानोरा सरपंच संघटनेकडून जनजागृती

‘आक्रोश क्रांती महामोर्चा‘त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तालुका धानोरा सरपंच संघटनेच्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. “आपल्या अस्तित्वासाठी, हक्क आणि अधिकारांसाठी” या महामोर्चात एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका धानोरा सरपंच संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध गावांमध्ये जाऊन मोर्चाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आदिवासी आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या मुला-बाळांचे भविष्य वाचविण्यासाठी हीच ती वेळ आहे, अशी भावना या जनजागृती मोहिमेतून व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गावांमध्ये जाऊन मोर्चाचे पत्रक मुख्य ठिकाणी लावले, आदिवासी बांधवांमध्ये मोर्चा संबंधित चर्चा केली आणि नियोजनाबद्दल माहिती घेतली.

यावेळी सरपंच संघटनेचे पुरुषोत्तम बावणे, संजय गावडे, कारवाफाचे धनीराम कुमरे, फुलबोडीचे सरपंचा मंगला करंगामी, कारवाफाचे सरपंचा महानंदा आतला, चिचोळाचे दिपा उसेंडी यांच्यासह विलास मडावी, कालूराम झूरी, महादेव सिडाम, नितीन कोडापे आदी पदाधिकारी व प्रमुख व्यक्ती गाव भेटीत उपस्थित होते. या जनजागृती मोहिमेतून “उठ आदिवासी जागा हो… संघर्षाचा धागा हो!” असा एकजुटीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button