
यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; प्राचार्यांनी दिला देशसेवेचा संदेश
अहेरी : येथील श्री. शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ए. सोमकुंवर यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक ७:४० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणापूर्वी आदरपूर्वक ‘वंदे मातरम’चे गायन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार. एस.आर.पी.एफ. (SRPF), जिल्हा पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सी.एन. गौरकार, डॉ. आर. डी. हजारे, दत्तूजी जाकेवार, प्रतीक शिंपी, राकेश वाघाडे आणि पूनम वाघाडे यांनी अथक परिश्रम घेतले.
सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार व इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सोहळ्याला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



