गडचिरोलीविदर्भ

युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचे काम प्रभावीपणे राबवा – कपिल ढोके यांचे आवाहन

गडचिरोलीत युवक काँग्रेसची आढावा बैठक; नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांचा जाहीर सत्कार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करून गावागावात युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचे काम प्रभावीपणे राबवा,” असे आवाहन युवक काँग्रेसचे नागपूर झोन प्रभारी कपिल ढोके यांनी केले. गडचिरोली येथे आयोजित युवक काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीत नागपूर झोन प्रभारी कपिल ढोके व गडचिरोली जिल्हा प्रभारी सुमंत कुरेकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये युवक काँग्रेसच्या संघटन बळकटीकरणावर प्रामुख्याने चर्चा झाली. आगामी काळातील पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, सदस्य नोंदणी अभियान तसेच विधानसभा निहाय संघटनात्मक आढावा यावेळी घेण्यात आला. विदर्भातील आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या स्थानिक प्रश्नांवर आगामी काळात तीव्र लढा उभारण्याबरोबरच, काँग्रेसची विचारधारा तळागाळातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सक्रिय भूमिका बजावावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

या आढावा बैठकीला जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जिल्हा प्रभारी सुमंत कुरेकर, नगरसेवक रमेश चौधरी, प्रदेश सचिव विवेक घोंगडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, अभिजित घाईत, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे, चारुदत्त पोहाणे, सुधीर बांबोडे, मिलिंद बागेसर, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, कुरखेडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर, अभिषेक वाळके, आशिष घेर, अमन लाकडे, मिलिंद राऊत, लोकेश पोटावी, निकेतन कोरे, सारंग दमाहे, वसीम शेख, लक्ष्मण आतला, वंश इंदुरकर, अमन सय्यद, कुणाल म्हशाखेत्री, पीशांतनू तोरे व अरविंद मडावी यांच्यासह जिल्हाभरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button