चंद्रपूरविदर्भ

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनकडून चंद्रपूर महानगरपालिकेला अग्निशमन वाहन प्रदान

चंद्रपूर : लॉयड्स इन्फिनाइट फॉउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर महानगरपालिकेला एक अग्निशमन वाहन भेट देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका साध्या समारंभात या वाहनाचे लोकार्पण झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक मधुर गुप्ता उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, लॉयड्स मेटल्स युनिट हेड वाय.जी.एस. प्रसाद, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, तरुण केशवाणी, दीपक साळवे तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी आणि लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लॉयड्स इन्फिनाइट फॉउंडेशनच्या या योगदानाला अत्यंत महत्त्वाचे मानले. ते म्हणाले, “शहराच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दल खूप महत्त्वाचे आहे आणि चंद्रपूर जिल्हा हा वनांनी समृद्ध आहे, त्यामुळे वनांमध्ये आग लागल्यास या वाहनाचा उपयोग होणार. तसेच चंद्रपूरमधील कोणत्याही गावात आपत्कालीन स्थितीत हे नवीन वाहन त्यांच्या कामाला अधिक सक्षम बनवेल. लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनने दाखवलेली सामाजिक बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे.”

लॉयड्स मेटल्सचे कार्यकारी संचालक मधुर गुप्ता यांनी सांगितले की, “आम्ही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून नेहमीच समाजासाठी योगदान देण्यासाठी तयार आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेला अग्निशमन वाहन देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे वाहन शहराच्या आपत्कालीन परिस्थितीत नक्कीच मदत करेल, अशी आशा आहे. महानगरपालिका आयुक्तांनी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे आभार मानले आणि नमूद केले की, हे नवीन अग्निशमन वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे शहराची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. या लोकार्पण सोहळ्याला शहरातील नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनीही उपस्थिती दर्शविली. लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button