क्राईमचंद्रपूरविदर्भ

जिवंत काडतूस आणि अंमली पदार्थांसह दोन आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बल्लारपूर : शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक महत्त्वाची कारवाई करून जिवंत काडतूस व अमली पदार्थांच्या अंशांचे कागदांसह दोन आरोपींना अटक केली आहे.

२४ सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बल्लारपूरच्या डॉ. झाकीर हुसैन वॉर्डमध्ये एक दुचाकीवरील दोघे व्यक्ती अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगून अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. या माहितीच्या आधारे, पथकाने रात्री ८.४५ च्या सुमारास मोपेड (सुझुकी ऍक्सेस क्रं एमएच ३४ सीजी २२९९) ची तपासणी केली. तपासणी दरम्यान, दुचाकीतून दोन जिवंत काडतूस, लायटर, सिल्व्हर रंगाचा गोगो पेपर, अर्धवट जळलेला सिल्व्हर पेपर आणि ४० कागदी चिटारे मिळाल्या. चिटाऱ्यावर अमली पदार्थांचे अंश आढळले. दोन्ही आरोपी झिंगलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी अक्षय बबन माणूसमारे (२४) रा. डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड, बल्लारपूर) आणि राजू गुलाब खोंडे (५४) रा. दत्त मंदिर जवळ, महाराणा प्रताप वॉर्ड यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत ७१ हजार ०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपींवर भारतीय हत्यार कायद्यानुसार व एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी केले, तर पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथकाने कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button