गडचिरोलीविदर्भ

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी जिल्ह्याच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी डॉ. अशोक नेते यांनी जमाल सिद्दीकी यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले तसेच त्यांच्या गडचिरोली आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात विविध संघटनात्मक तसेच सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या भेटीदरम्यान अल्पसंख्यांक समाजासमोरील विविध समस्या, अडचणी, केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत कसा पोहोचविता येईल, तसेच संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल मंथन करण्यात आले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस, न.प. सभापती तथा भाजप शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विलासजी भांडेकर, न.प. महिला बाल कल्याण सभापती तथा शहराध्यक्ष सिमा कन्नमवार, जिल्हा महामंत्री अल्पसंख्यांक आघाडी सलिम शेख, नगरसेविका तथा जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, नगरसेविका शिल्पा गव्हारे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, मनमोहन बंडावार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button